Chikkodi

चिकोडी तालुक्यात खुल्या विहिरीच्या कामकाजासाठी भूमिपूजन

Share

एसीपीपी पीएसटी या योजनेंतर्गत जैनापूर आणि तोरणहळ्ळी गावात दोन खुल्या विहिरींच्या निर्मितीच्या कामकाजासाठी ४५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे, अशी माहिती आमदार दुर्योधन ऐहोळे यांनी दिली आहे.

चिकोडी तालुक्यातील जैनापूर गावातील शिवराम कांबळे आणि इतरांच्या १२ एकर जमिनीत पाणी पुरविण्यासाठी सरकारच्यावतीने मंजूर करण्यात आलेल्या खुल्या विहिरींच्या कामकाजाचा शुभारंभ आज करण्यात आला.

या विहिरींच्या कामकाजाच्या भूमिपूजनानंतर बोलताना आमदार दुर्योधन ऐहोळे म्हणाले, जैनापूर तसेच तोरनहळ्ळी गावात दोन खुल्या विहिरींच्या निर्मितीसाठी ४५ लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. चिकोडी तालुक्यातील जैनापूर गावातील शिवराम कांबळे आणि इतरांच्या जमिनीला पाणी पुरवठा करण्यासाठी सरकारने मंजूर केलेल्या अनुदानातून या कामकाजाला सुरुवात करण्यात आली आहे अशी माहिती दुर्योधन ऐहोळे यांनी दिली.

यानंतर हेस्कॉम संचालक महेश भाते म्हणाले, सरकार एस सी एस टी समाजासाठी अनेक सुविधा उपलब्ध करून देत आहे. या सुविधांचा लाभ प्रत्येकाने घयावा, असे आवाहन त्यांनी केले.

ग्रामपंचायत अध्यक्ष एस एस घरगुडे बोलताना म्हणाले, अनुसूचित जाती जमातीतील जनता अजूनही गरिबीत जगत आहे. काहीजणांकडे थोड्या फार प्रमाणात जमिनी आहेत. परंतु त्यांना पाण्याची समस्या जाणवत आहे. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदारांच्या प्रयत्नातून पाणी पुरवठा होत आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी विजय कोटीवाले, रवी हिरेकोडी, राजू केळगीनमणी, मारुती परबुडे, कलगौड केळगीनमणी, भीमा तळवार, भालचंद्र सन्नलचप्पगोळ, बसवराज माळगे, सुनील खाड उपस्थित होते.

Tags: