Kagawad

ऐनापुरात अभियंता रवी यांचा शेतकऱ्यांतर्फे सत्कार; अनुदानासाठी केले प्रयत्न 

Share

कागवाड तालुक्यातील उपसा जलसिंचन योजनेतील बंधारावजा पुलाची गळती दुरुस्त करण्यासाठी .९९ कोटी रुपये निधीला सरकारने प्रशासकीय मंजुरी दिली आहे. यासाठी विशेष प्रयत्न केलेले अभियंता के. रवी यांचा शेतकऱ्यांतर्फे सत्कार करण्यात आला.

ऐनापूर येथे बुधवारी शेतकरी नेते आणि नगरपंचायत सदस्य प्रवीण गाणीगेर, अरुण गाणीगेर, पीकेपीएस अध्यक्ष कुमार अपराज आदींनी पाटबंधारे खात्याचे सहायक कार्यकारी अभियंता के. रवी यांचा सत्कार करून निधी मंजुरीसाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.   यावेळी बोलताना शेतकरी नेते अरुण गाणीगेर म्हणाले, गेल्या १२ वर्षांपासून ही योजना कार्यान्वित आहे. दर्जाहीन काम झाल्यामुळे कालव्याला कायमची गळती लागली आहे. त्यामुळे ऐनापूर गावच्या शेकडो शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याचे पाणी घुसून जमीन व पिके खराब होत आहेत.

ही बाब अनेकदा लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देऊन निवेदने दिली होती. मात्र त्याचा काहीच फायदा झाला नव्हता. त्यामुळे नाराज झालेल्या शेतकऱ्यांनी नुकतेच कार्यालयाला टाळे ठोकून निदर्शने केली होती. त्यावेळी बेजबाबदार अधिकारी शेतकऱ्यांच्या भावना समजावून घेत नसल्याचा आरोप मीसुद्धा केला होता. मात्र अभियंता रवी यांनी केवळ १० दिवसांतच ५ कोटी रुपये अनुदान मंजूर करवून घेत आपण बेजबाबदार अधिकारी नाही हे सिद्ध केले आहे. त्यांचे शेतकरी वर्गातर्फे अभिनंदन करतो असे सांगितले.   सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना अभियंता के. रवी म्हणाले, मुख्य कालव्याला गळती लागल्याने शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागत असल्याने त्यांनी निदर्शने केली होती. त्यांची मागणी योग्य असल्याने, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ४ कोटी ९९ लाख रुपये अनुदानाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. वर्षभरात कालवा दुरुस्तीचे काम पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन त्यांनी दिले.

 दरम्यान, ‘आपली मराठी’ने शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला प्रसिद्धी देत सविस्तर वृत्त प्रसारित केले होते. त्याची दखल घेत पाटबंधारे खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुमारे ५ कोटी रु अनुदानाला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. त्याबद्दल शेतकऱ्यांनी इन न्यूज-आपली मराठीचे यावेळी आभार मानले. फ्लो

यावेळी राजेंद्र पोतदार, आदिनाथ दानोळी, अरविंद कारची, सुरेश अडिसेरी, अभियंता प्रशांत पोतदार, सागर पवार आदी उपस्थित होते.

 

 

Tags: