सरकारी मराठी शाळेचा दरवाज्याचा कडीकोयंडा तोडून चोरी केल्याची घटना अथणी तालुक्यातील संबरगी गावात घडली आहे.

संबरगी गावातील सरकारी मराठी शाळेला लक्ष्य करत चोरटयांनी हजारो रुपये किंमतीचे शालेय साहित्य लांबवले आहे. दरवाजाचा कडीकोयंडा तोडून चोरटयांनी शाळेतील कॉम्प्युटर, प्रिंटर आणि शाळेची कागदपत्रे चोरटयांनी पळवली आहेत. इतके दिवस घरे-दुकानांना लक्ष्य करणाऱ्या चोरटयांनी आता विध्येच्या मंदिरालाही लक्ष्य केल्याचे या घटनेवरून दिसते. या चोरीमुळे संबरगी गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अथणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.


Recent Comments