खानापूर तालुक्यातील लोंढा गावातील गांधीनगर श्री मातंगी देवस्थान कमिटीतर्फे क्रिकेट स्पर्धा घेण्यात आल्या.

लोंढा ग्राम पंचायतीचे पीडीओ बालराज बजंत्री यांनी या क्रिकेट स्पर्धांचे उदघाटन केले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आजच्या युवकांनी क्रिकेटसोबतच आपल्या देशी खेळांमध्ये सहभाग घेऊन शरीर तंदुरुस्त ठेवले पाहिजे. शरीर तंदुरुस्त असेल तर मनही आपोआप तंदुरुस्त आणि साफ राहते. त्यामुळे युवकांनी शरीर तंदुरुस्त ठेवण्यावर भर दिला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी लोंढा ग्रापं अध्यक्ष शेवरीन डायस, समीर खान, नीलकंठ, कुमार पाटील, संतोष चंदनराव, नारायण उसुपकर, यशवंत गावडे, रफी आदी उपस्थित होते.


Recent Comments