शेतातील कूपनलिकेवर लावलेल्या वीजपंपात शॉर्टसर्किट होऊन लागलेल्या आगीत १२ एकरातील ऊस भस्मसात झाल्याची घटना चिक्कोडी तालुक्यातील बेडकिहाळ येथे घडली.

बेडकिहाळ रस्त्यावरील सुभेदार मळ्यातील शेतातील कूपनलिकेवर लावलेल्या वीजपंपात शॉर्ट सर्किट होऊन लागलेल्या आगीत १२ एकरातील ऊस भस्मसात झाला. वीजपंपात शॉर्ट सर्किट झाल्यानंतर ठिणग्या उडून आगीने पेट घेतला अन काही वेळातच बघताबघता १२ एकरातील संपूर्ण ऊस आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
या आगीत बापूसाब सुभेदार, उत्तम सुभेदार, कुमार सुभेदार, सुरेश सुभेदार, दीपक सुभेदार, दिलीप सुभेदार, दादा सुभेदार, अशोक सुभेदार, कुमार पाटील आणि दीपक सुभेदार यांच्या मालकीचा हा ऊस होता. स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दलाच्या जवानांनी आग विझविली. या प्रकरणी सदलगा पोलीस ठाण्यात दुर्घटनेची नोंद झाली आहे.


Recent Comments