तालुका प्रशासन, कायदे सेवा समिती आणि वकील संघ तसेच महिला आणि बालकल्याण विभागाच्या संयुक्त विद्यमाने तहसीलदार डॉ. डी. एच. होगार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ दिवाणी न्यायाधीश के एस रोट्टेर यांच्याहस्ते दीपप्रज्वलनाने करण्यात आली.

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर न्यायाधीश अंबण्णा के. बीईओ मोहन दंडीन, सीडीपीओ मंजुनाथ परसन्नवर, वकील संघाचे अध्यक्ष आर पी चौगुला, कृषी अधिकारी महादेव पटगुंदी, नगरपालिका मुख्याधिकारी मोहन जाधव, अनुसूचित वर्ग कल्याण अधिकारी व्ही. एम. नागनुरी, महांतेश उरवळगीन आदी उपस्थित होते. 
या कार्यक्रमात बोलताना न्यायाधीश के एस रोट्टेर यांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले कि, आधुनिक जगात युवावर्ग अनेक गोष्टींना बळी पडत चुकीच्या मार्गाने वाटचाल करीत आहे. स्मार्ट फोनच्या अतिरिक्त वापरामुळे सायबर क्राईम वाढलं चालला आहे. यामुळे स्त्रियांवरील अत्याचाराच्या प्रमाणात वाढ होत चालली आहे. याचप्रमाणे ड्रॅग माफियांचे प्रमाणदेखील अधिक होत चालले आहे. यावर वेळीच बंधन घालणे गरजेचे आहे. तसेच प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्रत्येक निवडणुकीत बजाविणे आवश्यक असल्याचेही न्यायाधीश रोट्टेर म्हणाले.
या कार्यक्रमाला तालुका पंचायत व्यवस्थापक आर ए चटणी, वकील आशा शिंगाडी, भीमसेन बागी, एम एम बालदार, श्रीशैल हिरेमठ, शशिकांत हेगडे, विविध महाविद्यालयातील विद्यार्थी, अंगणवाडी कार्यकर्त्या उपस्थित होत्या.


Recent Comments