Accident

अथणी विजापूर महामार्गावर अपघात : अपघातस्थळावरून थेट काढला व्हिडीओ!

Share

अथणी विजापूर राज्य महामार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. दररोज पाच ते सहा अपघात या महामार्गावर होत आहेत. अनेकांचे प्राणीदेखील या रस्त्यावर झालेल्या अपघातामुळे गेले आहेत. आजदेखील अशाच एका अपघातामुळे संतप्त नागरिकांनी थेट घटनास्थळावरून व्हिडीओ कैद करून सोशल मीडियावर व्हायरल करत लोकप्रतिनिधींना जाब विचारला आहे.

अथणी विजापूर राज्य महामार्ग हा खड्ड्यांच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्यापेक्षा खड्डे अधिक असलेल्या या महामार्गावर दररोज मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. खड्डे आणि रस्त्यावर पसरलेल्या खाडीमुळे दुचाकी वाहनचालकांना दररोज कसरत करावी लागत आहे शिवाय अनेक अपघातांना आमंत्रण देखील हे खड्डे देत आहेत. या रस्त्याच्या झालेल्या दुरवस्थेबाबत लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याने आज अपघात झालेल्या ठिकाणावरून संतप्त नागरिकांनी थेट व्हिडीओ कैद करत सोशल साईटवर वायरल केलाय. शिवाय याचा जाब देखील लोकप्रतिनिधींना विचारण्यात आलाय.

जिल्हा पालकमंत्र्यांच्या विरोधात नागरिकांनी आज संतप्त प्रतिक्रिया देत या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी केली आहे. अथणी तालुक्यातील मोळे या गावातील संतोष चोरमोले या युवकाने थेट अपघात स्थळावरूनच व्हिडीओ रेकॉर्ड करत पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. अथणी कागवाड या दोन्ही तालुक्यातील रस्त्यांची अशाचप्रकारे दुरवस्था झाली असून सर्व रस्त्यांची डागडुजी करून जनतेची गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली आहे.

Tags: