गरोदर महिलांची सातव्या महिन्यात चोळीपूजन करण्याची पद्धत आहे. पण गायीवरील प्रेमापोटी तिची चोळी करून गोडधोड खाऊ घालून पूजन करून चिक्कोडी तालुक्यातील इंगळी गावचे आबासाहेब पाटोळे यांनी एक नवा इतिहास घडविलाय.

होय, इंगळी गावच्या आबासाहेब पाटोळे यांचे आपल्या गायी-गुरांवर मुलाबाळांप्रमाणे प्रेम आहे. त्यातूनच त्यांनी ७ महिन्यांची गाभण असलेल्या आपल्या गायीचे चोळीपूजन केले. गायीला न्हाऊमाखू घालून पाटोळे कुटुंबीयांनी तिची हळद-कुंकू लावून पूजा करून साडी नेसवून ओटी भरली. गोडधोड खाऊ घालत शास्त्रोक्त विधिपूर्वक हा सोहळा पार पडला. यावेळी पाटोळे कुटुंबियांसह त्यांचे पै-पाहुणे, शेजारीही उपस्थित होते.
रुपाली पाटोळे, आक्काताई पाटील राधिका शिरहट्टी, राजश्री घोसरवाडे आदी सवाष्णींनी गायीचे पूजन केले.


Recent Comments