टिप्पर आणि दुचाकीच्या धडकेत आंबेवाडी चा युवक जागीच ठार झाल्याची घटना आज सकाळी साडे दहाच्या सुमारास घडली. याबाबत मिळालेली माहिती अशी की निखिल बसवंत कातकर वय 24 हा दुचाकीवरून हिंडलगा बॉक्साईट रोड मार्गे जात होता यावेळी बॉक्साइट रोड मार्गे सुळगा कडे जाणाऱ्या टिप्पर क्रमांक केए 22 बी 13 89 चा चालकाने दुचाकीला जोराची धडक दिल्याने दुचाकीवरील युवक निखिल कातकर जागीच ठार झाला. या घटनेची नोंद ग्रामीण पोलीस स्थानकात करण्यात आली असून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह पाठविण्यात आला आहे. तसेच अपघात झाल्यावर भयभीत चालकाने टिप्पर सोडून पलायन केल्याने पोलिस त्याचा शोध घेत आहेत.
Recent Comments