मूळचे चिक्कोडी तालुक्यातील कब्बूर गावचे रहिवासी आणि २०१४ च्या तुकडीचे केएएस अधिकारी संतोष कामगौडा यांनी चिक्कोडी प्रांताधिकारी पदाची सूत्रे स्वीकारली.

कर्नाटक प्रशासकीय सेवा परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर संतोष कामगौडा यांनी आधी प्रशिक्षणार्थी म्हणून व नंतर विविध ठिकाणी अधिकारी म्हणून सेवा बजावली आहे. रायचूर येथे प्रांताधिकारी म्हणून त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला आहे. चिक्कोडी प्रांताधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. चिक्कोडीतील भौगोलिक, सामाजिक रचनेविषयी आपल्याला माहिती असल्याने येथील जनतेचा आवाज बनून काम करेन अशी ग्वाही त्यांनी दिली. खऱ्या लाभार्थीना सरकारी पेन्शन योजनेचा लाभ व्हावा यासाठी सरकारने नवोदय ऍप सुरु केले आहे. त्याद्वारे तलाठ्यांना आपल्या परिसरातील ६० वर्षांपुढील नागरिकांची माहिती मिळते. त्यामुळे खऱ्या लाभार्थीना न्याय मिळतो. म्हणून या ऍपद्वारे काम करण्यात येईल असे कामगौडा यांनी सांगितले.
चिक्कोडी शैक्षणिक जिल्ह्यात कोरोना ओमीक्रॉनचा संसर्ग रोखण्यासाठी काटेकोर पावले उचलण्यात येत आहेत. जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेकांचा मृत्यू झाला. अनेक कुटुंबे उघड्यावर पडली. त्यामुळे तिसऱ्या लाटेत जनतेला त्रास होणार नाही याची प्रशासनातर्फे दक्षता घेण्यात येईल असे नूतन प्रांताधिकारी कामगौडा यांनी सांगितले.


Recent Comments