लहान मुलांच्या पूरक खाद्यपदार्थांच्या पॅकमधून ड्रग्जचा पुरवठा करण्याचा डाव बेंगळूर येथील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी हाणून पाडला. या प्रकरणी मूळच्या युगांडा येथील एका महिलेला अटक करून १.५ कोटी रुपये किंमतीचे ड्रग्ज जप्त करण्यात आले.
होय, आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटद्वारे भारतात ड्रग्जचा अवैध नशीला व्यापार करण्याचा प्रयत्न आज एनसीबी अधिकाऱ्यांनी हुबळी येथे हाणून पाडला. हुबळी रेल्वेस्थानक परिसरात मूळच्या युगांडाच्या व दिल्लीहून आलेल्या एका महिलेची झडती घेतली असता, तिच्याकडे सेरेलॉक या लहान मुलांच्या पूरक खाद्यपदार्थांच्या २ पॅकमध्ये प्रत्येकी ९९५ ग्रॅम वजनाचे मादक पदार्थ आढळून आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १ कोटी ५ लाख रुपये आहे. ते जप्त करून एनसीबी अधिकाऱ्यांनी महिलेला अटक करून चौकशी चालवली आहे.
Recent Comments