Belagavi

आधी जागृती, नंतर दंड; कोरोना मार्गसूचीबाबत पोलीस आयुक्तांची भूमिका

Share

कोरोनाचा रूपांतरित विषाणू ओमीक्रॉनचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी मार्गसूची जाहीर केली आहे. तिचे पालन करणे आम्हा सर्वांचे कर्तव्य आहे असे बेळगावचे नूतन पोलीस आयुक्त डॉ. बोरलिंगय्या यांनी सांगितले

बेळगावात सुरु असलेल्या पोलिसांच्या वार्षिक क्रीडास्पर्धांच्या पार्श्वभूमीवर बोलताना पोलीस आयुक्त बोरलिंगय्या म्हणाले, कोरोनाचा धोकादायक रूपांतरित विषाणू ओमीक्रॉनचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने नवी मार्गसूची जाहीर केली आहे. तिचा अमल करण्यासाठी बेळगाव जिल्हा प्रशासन, पोलिसांनी सर्व तयारी केली आहे. यासाठी मास्क वापरणे, सामाजिक अंतर पाळणे आदी प्राथमिक खबरदारीबाबत जनजागृती करण्यात येईल. त्यानंतर नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.

Tags: