रामनगर येथे सोमवारी एका कार्यक्रमात खा. डी. के. सुरेश आणि मंत्री अश्वथनारायण यांच्या मुख्यमंत्र्यांसमोरच खडाजंगी झाली होती. त्यानंतर खा. सुरेश यांच्या निषेधार्थ भाजपने राज्यभरात रान उठवले आहे. बेळगावातही भाजप कार्यकर्त्यांनी आज सुरेश यांचा निषेध केला.

होय, मंगळवारी सकाळी बेळगावातील चन्नम्मा चौकात भाजपच्या महानगर, ग्रामांतर आणि युवामोर्चा कार्यकर्त्यांनी खा. डी. के. सुरेश यांच्या विरोधात घोषणाबाजी करून शंखध्वनी करत त्यांच्या प्रतिमेचे दहन केले.
यावेळी पत्रकारांशी बोलताना भाजप नेते मुरूघराजेंद्र गौडा म्हणाले, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत मंत्री अश्वथनारायण बोलत असताना काँग्रेस खा. डी. के. सुरेश यांनी त्यांच्याशी केलेले वर्तन पाहता, त्यांची संस्कृती काय आहे हे दिसून येते. खा. डी. के. सुरेश यांचे हे वर्तन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार याना मान्य असेल तर कर्नाटकातील जनता त्यांना चांगला धडा शिकवेल.
https://www.facebook.com/innewsbelgaum/videos/714035343334779
आणखी एक भाजप नेते एफ. एस. सिद्दनगौडर यावेळी म्हणाले, कालच्या घटनेचा केवळ राज्यातच नव्हे तर देशात निषेध करण्यात येत आहे. मुख्यमंत्री समोर असताना सरकारी कार्यक्रमात काँग्रेस नेत्याने केले वर्तन आक्षेपार्ह आहे. एका मंत्र्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न लोकशाहीविरोधी आहे असा आरोप त्यांनी केला.
प्रसाद देवरमनी यांनी, खा. डी. के. सुरेश यांच्या वर्तनाबद्दल त्यांच्यावर गुंडा कायद्याखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
महंत वककुंद, पृथ्वीसिंग चव्हाण यांच्यासह भाजप नेते, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी या निदर्शनात भाग घेतला.
Recent Comments