Belagavi

प्रकाश शिरोळकरांसह शिवसैनिकांना अटक

Share

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेच्या घटनेचे बेळगावात तीव्र पडसाद उमटत आहेत. या घटनेनंतर एसपीएम रोडवरील छत्रपती शिवाजी उद्यानात शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पूजा करण्यास पोलिसांनी शिवसैनिकांना अटकाव केला.

बेंगळुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या विटंबनेचा तीव्र पडसाद बेळगावात शुक्रवारी रात्रीपासूनच उमटत आहेत. त्यामुळे बेळगावात १४४ कलम लागू करण्यात आले आहे. आज सकाळी शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी शिवाजी उद्यानात जाऊन शिवरायांच्या पुतळ्याची पूजा करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांना प्रवेशद्वारावरच अडविले. त्यामुळे शिवसैनिक व पोलिसांत वादावादी झाली.

त्यानंतर पोलिसांनी प्रकाश शिरोळकर व कार्यकर्त्यांना अटक केली.

Tags: