Khanapur

चन्नराज हट्टीहोळी यांना बहुमताने विजयी करा : माजी मंत्री ए. बी. पाटील यांचे आवाहन

Share

१० डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषद निवणुकीत मतदानाचा करण्याचा हक्क सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांना असून आपण सर्वांनी आपले प्रथम पसंतीचे मत काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांना देऊन विजयी करा, असे आवाहन माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी केले.

खानापूर तालुक्यातील कक्केरी या गावात ज्येष्ठ राजकारणी, खानापूर अंजुमन कमिटीचे अध्यक्ष रियाज अहमद पटेल यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत काँग्रेसचे उमेदवार चन्नराज हट्टीहोळी यांना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले. याचप्रमाणे मतदानाच्या पद्धतीचीही माहिती दिली.

मागील वेळी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत आमच्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान करताना मतदारांना गोंधळ झाला होता. काही छोट्याछोट्या चुकांमुळे सुमारे पाचशेहे ते सहाशेहे मते उपयोगाला आली नाहीत. यामुळे या निवडणुकीत लक्षपूर्वक मतदान करून ब्लॉकमध्ये योग्यपद्धतीने लिहिण्यात यावे, निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या पेन नेच आपले मत लिहावे, आणि केवळ काँग्रेस पक्षाला मतदान करावे, असे आवाहन ए बी पाटील यांनी केले.

यावेळी माजी मंत्री, खानापूर अंजुमन कमिटीचे अध्यक्ष रियाझ अहमद पटेल, आर. के. पाटील, राजू मगदूम, अष्पाक पटेल, लायकली बिच्चूनवर, भीमाप्पा अंबोजी, काशीम हट्टीहोळी, महेश पाटील आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: