निवडणुकीत येणाऱ्या-जाणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका. केवळ आश्वासने देऊन विकास होत नाही. विधान परिषद सदस्यपदी माझी निवड केल्यास जिल्ह्याचा संग्रह विकास करण्यासाठी मी तयार आहे, असे प्रतिपादन विधान परिषदेचे अपक्ष उमेदवार लखन जारकीहोळी यांनी केले आहे.

खानापूर जवळील करंबळ या गावातील पाटील गार्डन येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी मतयाचना करत पंचायतींसाठी अधिकाधिक अधिकारी मिळविण्याचा संकल्प बोलून दाखविला.
या निवडणुकीत मी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत असून विविध राष्ट्रीय पक्षांना आव्हान देण्यासाठी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासासाठी सेवा करण्यासाठी मी निवडणूक लढवत असल्याचे लखन जारकीहोळी म्हणाले. आपले एक मत लाख मतांच्या समान असून १० डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत पहिल्या पसंतीचे मत देण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी तालुक्यातील ग्रापं पंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सर्व सदस्य, नगर पंचायतीचे सदस्य तसेच प्रतिनिधी उपस्थित होते.


Recent Comments