Hukkeri

हुक्केरी शहरात संविधान दिनाचे आचरण

Share

हुक्केरी शहरात संविधान दिनाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायाधीश के आर रोट्टेर यांच्या उपस्थितीत संविधान दिनाचे आचरण करण्यात आले होते.

शहरातील न्यायालयात सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. न्यायाधीश के. आर. रोट्टेर यांच्याहस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

डॉ.बी.आर.आंबेडकर यांनी स्थापन केलेली घटना मसुदा समिती पूर्णत: यशस्वी झाली तसेच देशवासियांना प्रेरक शक्ती मिळण्यासाठी २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून आचरणात आणण्यात येत असल्याचे मत न्यायाधीश के. आर. रोट्टेर यांनी व्यक्त केले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर राज्यघटनेत शासन, न्यायव्यवस्था, जनतेचे हक्क यासंबंधीचे नियम आपण घटनेत पाहू शकतो, असे मत न्यायाधीश आंबन्ना के. यांनी व्यक्त केले.

यानंतर ज्येष्ठ न्यायाधीश बी बी. पासप्पगोळ, ओई एम. पाटील , एन. जी. कुलकर्णी, पी. आर. चौगुला, पी. एस. मुतालिक, आर. व्ही. जोशी यांचा वकील संघाच्यावतीने सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला वकील संघाचे अध्यक्ष डी. के. अवरगोळ, उपाध्यक्ष आय. के. हुलीकट्टी, कार्यदर्शी एच. एल. पाटील तसेच हुक्केरी बार असोसिएशनचे सदस्य, आणि वकील उपस्थित होते.

Tags: