Chikkodi

पुन्हा एकदा संधी द्या : विधान परिषद उमेदवार महांतेश कवटगीमठ यांचे आवाहन

Share

दोनवेळा मी विधान परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सभागृहाबाहेर लढा देऊन स्थानिक संस्थांच्या समस्यांवर तोडगा काढण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला आहे. अशाच पद्धतीने मला पुन्हा एकदा संधी देण्यात आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी पुन्हा असेच प्रामाणिक प्रयत्न करेन, असा भरवसा भाजपचे उमेदवार महांतेश कवटगीमठ यांनी दिला.

चिक्कोडी शहरात प्रसारमाध्यमांशी बोलताना, महांतेश कवटगीमठ म्हणाले, खानापूर, निपाणी, कागवाड, कित्तूर, मुडलगी या नव्या तालुक्यांच्या निर्मितीसाठी सदस्यांसमवेत प्रयत्न केले. या तालुक्यांमध्ये सर्व कार्यालये समाविष्ट करावीत, या कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, केरळ मॉडेलप्रमाणे सदस्यांना सर्व लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करेल, असे आश्वासन महांतेश कवटगीमठ यांनी दिले.

यंदाची निवडणूक मी भाजपच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून लढवत आहे. सर्व ग्राम पंचायती आणि नगर पंचायतीच्या सदस्यांनी मला प्राधान्य देऊन मतदान करावे, असे निवेदन महांतेश कवटगीमठ यांनी केले.

Tags: