Khanapur

पत्रकार डी. व्ही, कम्मार यांना राज्योत्सव पुरस्कार

Share

 खानापूर तालुक्यातील अवरोळी गावचे पत्रकार डी. व्ही, कम्मार याना एकाच महिन्यात दोन पुरस्कार मिळाले आहेत.  

धारवाड येथील नवीलुगिरी साहित्य व सांस्कृतिक वेदिकेचा साहित्य व पत्रकारिता क्षेत्रासाठी दिला जाणारा यंदाचा राज्योत्सव पुरस्कार त्यांना मिळाला आहे. धारवाडमधील रंगायन समुच्चय भवनात नुकत्याच झालेल्या कन्नड हब्बा समारंभात त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. अध्यक्षस्थानी नंदगडचे सीपीआय सतीश माळगोंड होते. यावेळी नवीलुगिरी साहित्य व सांस्कृतिक वेदिकेच्या अध्यक्षा प्रतिभा पाटील, सचिव राजेंद्रकुमार मठ व अन्य मान्यवर उपस्थित होते. पत्रकार कम्मार याना अलिकडेच श्रमिकरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

 

 

Tags: