अथणीतील शिवयोगी नगरात दरवर्षी प्रमाणे यंदाही कार्तिक मासानिमित्त केरी लक्कव्वा देवीची वार्षिक यात्रा उत्साह, भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

वार्षिक यात्रेनिमित्त लक्कव्वा देवीची विशेष पूजा करण्यात आली. महिलांनी देवीची ओटी भरून दर्शन घेतले. यात्रेनिमित्त शिवयोगी नगरात उत्साहाचे वातावरण होते. मंदिर परिसरात महिलांनी सुरेख रांगोळ्या घातल्या होत्या. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. यात्रेनिमित्त विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. याबाबत महांतेश यांनी अधिक माहिती दिली. बाईट
यावेळी बसू बकारी, बाबू जोगानी, शिवपाद रोकडी, शिवानंद बल्लोळी, चिदानंद हळदमल, अप्पासाहेब हळदमल, गिरीश दिवाणमल, नागेश कन्नूर, अप्पू किवटी, केदारी हळदमल, शिवाप्पा कोळी, सतीश पाटील आदी उपस्थित होते.


Recent Comments