Khanapur

पाटा तुटल्यामुळे बसची झाडाला धडक

Share

पाटा तुटल्यामुळे कर्नाटक परिवहन मंडळाच्या बसने झाडाला धडक दिल्याची घटना खानापूरबिडी रस्त्यावरील होन्नम्मा देवस्थानसमोर मंगळवारी घडली. सुदैवानेच या अपघातात प्राणहानी टळली.

होय, बसचा पाटा कट झाल्याने बस थेट झाडाला आढळल्याची घटना सकाळी-सकाळीच खानापूर-बिडी रस्त्यावरील होन्नम्मा देवस्थानसमोर आज, मंगळवारी घडली. यावेळी बसमध्ये चालक आणि कंडक्टर वगळता कोणी प्रवासी नव्हते. त्यामुळे कोणतीही प्राणहानी झाली नाही. बस किंचित जरी पुढे गेली असती तर उलटण्याची धोका होता. मात्र सुदैवानेच झाडाला धडकल्यानंतर चालकाने कौशल्याने बस जागीच थांबवली. सुदैवाने बस रस्त्याकडे खड्ड्यात थांबल्याने प्राणहानी टळली.

 

 

Tags: