खानापूर शहरातील मेदार गल्लीत शुक्रवारी शिवशरण मेदार खेतेश्वर जयंती अत्यंत भक्तिभावाने साजरी करण्यात आली.

मेदार खेतेश्वर जयंतीनिमित्त खानापूर नगरपंचायतीच्या उपाध्यक्षा लक्ष्मी अंकलगी यांच्याहस्ते मेदार खेतेश्वर नामफलकाचे पूजा करून अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वाना मेदार खेतेश्वरांनी दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करण्याचे आवाहन केले.
यावेळी नगरपंचायत माजी अध्यक्ष बसवप्रभू हिरेमठ, विद्यमान सदस्य आप्पय्या कोडोळी, समाजसेवक रवी काडगी, श्रीधर अंकलगी यांच्यासह मेदार खेतेश्वर समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments