Khanapur

आ. डॉ. अंजली निंबाळकर यांचा कुस्ती महासंघातर्फे सत्कार

Share

अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे खानापूरच्या . डॉ. अंजली निंबाळकर यांचा सत्कार करून गौरविण्यात आले.

खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांचा अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या बेळगाव जिल्हा शाखेतर्फे त्यांच्या समाजसेवेची दखल घेऊन सत्कार करून गौरविण्यात आले. कोरोना काळात हेल्पलाईन केंद्र स्थापन करून जनतेची सेवा करणे, अंजलीताई फौंडेशनच्या वतीने मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे याबाबत तसेच अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या मॅरेथॉन पदयात्रा समितीवर निवड झाल्याबद्दल आ. निंबाळकर यांचा कुस्ती महासंघातर्फे स्मृतीचिन्ह, मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.   यावेळी अखिल भारतीय कुस्ती महासंघाच्या बेळगाव जिल्हा शाखेचे पदाधिकारी, कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

Tags: