Kagawad

मंगसुळी येथील मल्लिकार्जुन मंदिरात लक्षदीपोत्सव

Share

अंधारावर मात करून ज्ञानाच्या दिशेने वाटचाल करण्याच्या हेतूने कागवाड तालुक्यातील मंगसुळी गावातील २०० वर्ष प्राचीन श्री मल्लिकार्जुन मंदिरात बेळ्ळन्की हिरेमठाच्या श्री शिवलिंग शिवाचार्यांचा दीपोत्सव कार्यक्रम पार पडला.

बुधवारी सायंकाळी मंगसुळी गावातील श्री मल्लिकार्जुन देवस्थानात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला शिवलिंग शिवाचार्य स्वामी आणि मंगसुळी गिरी आश्रमाचे नागलिंग स्वामी यांनी चालना दिली.

या कार्यक्रमात बेळ्ळनकी हिरेमठाचे श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामीजी बोलताना म्हणाले, मनुष्याच्या जीवनात प्रकाशाचे महत्व मोठे आहे. साक्षात्कारासाठी ज्ञानामृताची आवश्यकता आहे. सनातन धर्माचे आचरण आणि तत्वसिद्धांत मनुष्याच्या अंतरात्म्याच्या ज्ञानासाठी आणि अंधकारातून प्रकाशाकडे वाटचाल करण्यासाठी आवश्यक असल्याचे मत श्री शिवलिंग शिवाचार्य स्वामींनी व्यक्त केले.

यावेळी मल्लिकार्जुन देवस्थान समितीचे अध्यक्ष चिदांद माळी बोलताना म्हणाले, २०० वर्षाचा इतिहास असलेल्या मल्लिकार्जुन मंदिरात सरकारचे कोणतेही सहकार्य न घेता लोकवर्गणीतून १.२० कोटी रुपयांच्या खर्चातून मंदिराचे बांधकाम करण्यात आले आहे. लक्ष दीपोत्सवाचे हे दुसरे वर्ष असून सुमारे १० हजार भक्तांसाठी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात येत आहे, अशी माहिती चिदांद माळी यांनी दिली.

यावेळी अशोक पाटील, संभाजी पाटील, शालिनी दोडमनी, सुधाकर भगत, श्रीशैल कामेरी, ट्रस्टी मल्लप्पा कोष्टी, अशोक माली, मल्लप्पा मगदूम, प्रकाश माळी, अशोक कुंभार यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: