Ramdurg

रामदुर्ग तालुक्यात हत्तीणीचा मृत्यू

Share

रामदुर्ग तालुक्यातील चिप्पलकट्टी गावातील श्री महालक्ष्मी देवस्थानाच्या हत्तीणीचा मृत्यू झाला आहे.

रामदुर्ग तालुक्यातील चिप्पलकट्टी गावातील श्री महालक्ष्मी देवस्थानाच्या सुधा नामक हत्तीणीचा आज सकाळी मृत्यू झाला. सदर हत्तींनी काही दिवसांपूर्वी जखमी झाली होती. तिच्यावर गेला महिनाभर उपचार देखील सुरु होते. परंतु उपचाराचा कोणताही फायदा न होता सदर हत्तींनीचा मृत्यू झाला आहे. १९७५ साली चिप्पलकट्टी गावात दाखल झालेल्या या हत्तिणीचा श्री महालक्ष्मी देवस्थानासह राज्यातील विविध कार्यक्रमात सहभाग होता. हत्तीणीच्या मृत्यूमुळे चिप्पलकट्टी गावातील नागरिकांना अश्रू अनावर झाले.

या हत्तीणीची सेवा केवळ रामदुर्ग तालुक्यापुरती मर्यादित नव्हती. उत्तर कर्नाटकातील विविध जिल्ह्यातील जत्रा, यात्रा, मिरवणुका, समारंभ, महासुर येथील दसरोत्सव अशा विविध कार्यक्रमात सुधा नामक हत्तीणीचा समावेश होता. माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा हेदेखील या हत्तीणीवर स्वार झाले होते. बेळगाव राज्योत्सवातील मिरवणुकीत देखील सुधा चा समावेश होता. या हत्तीणीसंदर्भात महालक्ष्मी देवस्थानाच्या पुजाऱ्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

चिप्पलकट्टी गावात ४६ वर्षे वास्तव्य करून अनेक समारंभाची शान वाढविणाऱ्या या हत्तीणीच्या मृत्यूमुळे गावात दुःखाचे वातावरण पसरले आहे. या हत्तिणीचे अनेकांनी अंतिम दर्शन घेतले. शोकाकुल वातावरणात हत्तीणीवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Tags: