Nippani

२९ नोव्हेंबरपासून बारावीची सहामाही परीक्षा

Share

 कर्नाटक राज्य पदवीपूर्व शिक्षण खात्याने २०२०२१ या वर्षाच्या पीयूसी द्वितीय वर्षाच्या सहामाही (मध्यवार्षिक) परीक्षा येत्या २९ नोव्हेंबरपासून घेण्याचे ठरविले आहे.

२९ नोव्हेंबर ते १० डिसेंबरपर्यंत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. पदवीपूर्व शिक्षण खात्याने आपल्या संकेतस्थळावर ही माहिती दिली असून, परीक्षेचे वेळापत्रकही जाहीर केले आहे. विध्यार्थी आणि पालकांनी अधिक माहितीसाठी खात्याच्या संकेतस्थळाला भेट घ्यावी असे आवाहन खात्याच्या संयुक्त संचालकांनी केले आहे.

 

 

 

Tags: