Hukkeri

हुक्केरी तालुक्यात आंतरराज्य कब्बडी स्पर्धांचे आयोजन

Share

अस्सल मातीतील खेळ म्हणून ओळखला जाणारा कब्बडी खेळ हा सुदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाने खेळावा असे आवाहन माजी खासदार आणि बिडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांनी केले आहे.

हुक्केरी तालुक्यातील बेळवी गावात दिवाळी निमित्त बेळवी ग्रामचे सुपुत्र आणि बेंगळूर शहराच्या एसीबी विभागाचे इन्स्पेक्टर हणमंत भजंत्री, बेळगाव जिल्हा अमेचूर कब्बडी असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराज्य स्तरावरील महिला आणि पुरुष संघाच्या कब्बडी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे उद्घाटन माजी खासदार आणि बिडीसीसी बँकेचे अध्यक्ष रमेश कत्ती यांच्या हस्ते पार पडले. सदर स्पर्धेत दावणगेरे, बेंगळुरू, हुबळी, म्हैसूर,तसेच महाराष्ट्रातील सांगली, मुंबई याठिकाणाहून सुमारे २० महिलांचे संघ सहभागी झाले होते;.

या स्पर्धेचे उद्घाटन करून उपस्थितांना उद्देशून बोलताना रमेश कत्ती म्हणाले, ग्रामीण खेळ अलीकडच्या काळात लुप्त होत चालले आहेत. आजच्या तरुण पिढीने अस्सल खेळ टिकवून ठेऊन देशासह आपले आरोग्यदेखील सुदृढ ठेवावे, असे आवाहन केले.आज सर्वच क्षेत्रात महिला आघाडीवर असून कब्बडी सारख्या खेळातदेखील महिला सहभागी होत आहेत. भविष्यात असे खेळांच्या माध्यमातूनच आरोग्य सुधारणा होऊ शकेल. शिवाय विजय-पराभव यापेक्षा उत्तम क्रीडापटू होण्याचे स्वप्न बाळगण्याचे आवाहन देखील रमेश कत्ती यांनी केले.

या कार्यक्रमात बेळवी गावचे नेते, हिरण्यकेशी सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापक संचालकपदी सातप्पा कर्किनाईक यांची निवड झाल्याबद्दल तसेच सीपीआय हणमंत भजंत्री याना मुख्यमंत्री सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आल्याने त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. (फ्लो)

कार्यक्रमाच्या व्यासपीठावर तहसीलदार डॉ. डी. एच. हुगार, तालुका पंचायत इओ उमेश सिदनाळ, राजभावांचे विशेष कर्त्यव्याधिकारी चंद्रकांत भजंत्री, ग्रामपंचायत अध्यक्ष जयश्री सत्यायिगोळ, उपाध्यक्ष शोभा मगदूम, सदस्य रमेश कुलकर्णी आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: