क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरलेला ट्रक उलटल्याची घटना बेळगाव–खानापूर मार्गावर गणेबैलजवळील खेमेवाडी येथे घडली. सुदैवानेच या दुर्घटनेत प्राणहानी झाली नाही.

होय, सध्या साखर कारखान्यांनी ऊस गाळप हंगाम सुरु केल्याने सर्वत्र उसाची वाहतूक होताना दिसत आहे. वाहनाच्या क्षमतेहून अधिक उसाची वाहतूक केली जात असल्याचेही चित्र आहे. काल खानापूर तालुक्यातील बिडीहून नंदीकोडी येथील दूधगंगा साखर कारखान्याला ऊस घेऊन जाणारा ट्रक गणेबैलजवळील खेमेवाडी येथे उलटला. क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने हा ट्रक उलटला. एमएच -०९ सीए -५००० असा या ट्रकचा नंबर आहे. दरम्यान, ट्रक उलटणार याची कल्पना येताच चालक बाबू दस्तगीर अत्तार याने ट्रकमधून उडी घेऊन आपला जीव वाचविला. त्याशिवाय ट्रकच्या आसपास अन्य वाहने नसल्याने सुदैवाने या दुर्घटनेत प्राणहानी झाली नाही. दरम्यान ट्रक उलटतानाचा व्हिडिओ सोशल मेडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.


Recent Comments