दिवंगत बी. आर. संगप्पगोळ यांच्या इच्छेनुसार चिक्कोडी तालुक्याला स्वतंत्र जिल्ह्याचा दर्जा देण्यास भाजप सरकार तयार आहे. मात्र चिक्कोडी, गोकाक जिल्हा रचनेमध्ये काही तांत्रिक अडथळे आहेत असे रायबागचे आ. दुर्योधन ऐहोळे यांनी सांगितले.

चिक्कोडी तालुक्यातील जागनूर येथे पत्रकारांशी बोलताना आ. दुर्योधन ऐहोळे म्हणाले, चिक्कोडी, गोकाक जिल्हा रचनेचा विषय भाजप सरकार विसरलेले नाही. त्यासाठी सरकार तयार आहे. मात्र बेळगावात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सीमाभागाच्या दाव्यामुळे आणि काही तांत्रिक अडचणींमुळे हा निर्णय होऊ शकलेला नाही. भाजप सरकारच्या कार्यकाळातच चिक्कोडी, गोकाक जिल्हा रचना करू असे त्यांनी सांगितले. सिंदगी-हानगल मतदारसंघात भाजपचेच उमेदवार विजयो होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. त्याचप्रमाणे आपण मंत्रिपदासाठी इच्छुक नाही. सरकारच्या, विविध निगम-मंडळांच्या योजना आणून मतदारसंघाचा विकास करण्यासाठीच मी प्राधान्य देईन असे आ. ऐहोळे यांनी सांगितले. बाईट याप्रसंगी युवा नेते पवन कत्ती व अन्य उपस्थित होते.


Recent Comments