एकाच कुटुंबातील ५ जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना हुक्केरी तालुक्यातील बोरगल गावात घडली आहे. या घटनेने बोरगल परिसरात खळबळ उडाली आहे.

होय, एकाच कुटुंबातील ५ जणांनी विष पिऊन आत्महत्या केल्याची घटना बोरगल येथे घडली असून त्यामुळे गावावर शोककळा पसरली आहे. ४६ वर्षीय निवृत्त जवान गोपाल दोड्डप्पा हादीमनी यांच्या घरात ही घटना घडली आहे. गोपाल यांच्यासह त्यांच्या ३ मुली आणि एका मुलाने अशा एकूण ५ जणांनी आत्महत्या केली आहे. गोपाल तसेच त्यांच्या मुली १९ वर्षीय सौम्या गोपाल हादीमनी, १६ वर्षीय स्वाती गोपाल हादीमनी, १२ वर्षीय साक्षी गोपाल हादीमनी आणि १० वर्षीय सृजन गोपाल हादीमनी अशी मृतांची नावे आहेत. या सामूहिक आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
परंतु गोपाल हादीमनी यांच्या पत्नीचे नुकतेच कोरोनामुळे निधन झाले होते. तिच्या विरहातून गोपाल हादीमनी यांनी हे टोकाचे पाऊल उचलले का यावरून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. घटनास्थळी संकेश्वरचे पीएसआय गणपती कोगनोळी व सहकाऱ्यांनी भेट देऊन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवून दिले.


Recent Comments