Kagawad

कागवाड मतदार संघातील जनतेसाठी आमदार श्रीमंत पाटील यांच्यातर्फे पेन्शन अभियान

Share

कागवाड मतदारसंघाचे आमदार श्रीमंत पाटील यांच्या आदेशानुसार मतदारसंघातील जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी पेन्शन महाभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानाचा सदुपयोग येथील जनतेने करून घ्यावा, असे आवाहन आप्त सहाय्यक सचिन देसाई यांनी केले आहे.

२२ ऑक्टोबर ते १० नोव्हेंबर पर्यंत या महापेन्शन अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार श्रीमंत पाटील यांच्या आदेशानुसार आतापर्यंत अनेक गावांना राज्य सरकारच्यावतीने देण्यात येणारी पेन्शन मंजूर करण्यात आली असून लाभार्थ्यांना सदर पेन्शन देण्यात येणार आहे.

काही गावातील नागरिक पेन्शनपासून वंचित असलेल्या कुटुंबांसंदर्भात बातम्या समोर येत असून पेन्शन अभियान प्रारंभ करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रे आमदारांच्या संपर्क कार्यालयात सादर करण्याचे आवाहन सचिन देसाई यांनी केले आहे.

कागवाड मतदारसंघातील कागवाड, शिरगुप्पी, जुगुळ, मंगावती, शहापूर, मेळवाड या गावातील जनतेने कागवाड जनसंपर्क कार्यालयात भेट देऊन, संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. उगार खुर्द, उगार बुद्रुक, ऐनापुर, मंगसुळी, कृष्ण कित्तूर, बनजवाड, कात्राळ या गावातील लाभार्थ्यांनी आमदारांच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रे सादर करावीत, इतर गावची कागदपत्रे केंपवाड येथील आमदारांच्या कार्यालयात दाखल करावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी आमदारांचे आप्त सहाय्यक विनायक शिंदे – ९७४०८८५४००, सचिन देसाई -७६२५०९६४५२, राजू माने – ९७४१६५२७६६ यांच्याशी संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

 

Tags: