चिकोडी तालुक्यातील मांजरी गावात ईद-ए-मिलाद या सणाच्या निमित्ताने मुलांसाठी जलसा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

मुस्लिम बांधवांचा ईद-ए-मिलाद हा सण नुकताच सध्या आणि उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यंदा मांजरी गावात पहिल्यांदाच महम्मद पैगंबर यांच्या जीवनावर भाषण आणि कुराण पठण स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत 100 हुन अधिक मुलांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत सहभाग घेतलेल्या सर्व मुलांना प्रमाणपत्र, शालोपयोगी साहित्य देऊन गौरविण्यात आले. यासंदर्भात सलमान यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, महम्मद पैगंबर यांच्या तत्वानुसार आम्ही आमच्या धर्माचे पालन करत आहोत. कुणाशी वाईट वागू नये, कुणाचे वाईट चिंतू नये या महम्मद पैगंबर यांच्या तत्वानुसार आम्ही धर्म आचरण करत असून आज मांजरी येथे मुलांसाठी भाषण आणि कुराण पठाण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे, असे ते म्हणाले.
यावेळी दिलीप पवार, संजू नांदरे, झाकीर तराळ, फारूक तांबूळे, नजीर तराळ, मौलाना मिरसाब, मुनीर कोथळी, साजिद गडकरी, हैदर तराळ, साकीब तराळ, सुलेमान तराळ, मौला तराळ आदींसह इतर उपस्थित होते.


Recent Comments