Chikkodi

विजापूरप्रमाणे चिकोडी – गोकाक स्वतंत्र जिल्हा करण्याची मागणी

Share

स्वतंत्र विजापूर जिल्ह्याच्या रचनेप्रमाणेच गोकाक आणि चिकोडी देखील स्वतंत्र जिल्हा घोषित करावा हि मागणी वाढत आहे. बेळगाव जिल्हा लोकप्रतिनिधींविरोधात चिकोडी गोकाक येथील आंदोलनाने पुन्हा डोके वर काढले आहे. बेळगावमध्ये होणाऱ्या अधिवेशनादरम्यान चिकोडी गोकाक जिल्हा स्वतंत्र जिल्हा म्हणून घोषित करण्यासंदर्भात उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.

व्हॉइस : राज्यात प्रशासकीयदृष्ट्या, लोकसंख्या, क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून तसेच सर्वात मोठा जिल्हा म्हणून बेळगाव जिल्ह्याचे नाव घेतले जाते. बेळगाव जिल्ह्यात १४ तालुके आहेत. राज्यातील इतर कोणत्याही जिल्ह्यात तालुके आणि उपविभागांची इतकी मोठी संख्या नाही. बल्लारी जिल्ह्याच्या विभाजनानंतर आता बेळगावच्या विभाजनाची चर्चा आता होऊ लागली असून चिकोडी आणि गोकाक स्वतंत्र जिल्ह्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. सरकार आणि लोकप्रतिनिधीच्या बेजबाबदारपणामुळे हि मागणी अद्याप रखडली आहे, बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनामध्ये राजकीय स्वार्थाचा अभाव देखील आहे असे मत जिल्हा आंदोलनकर्ते चंद्रकांत हुक्केरी यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र सीमेवर असणाऱ्या चिकोडी उपविभागातील हुक्केरी, निपाणी, रायबाग, चिकोडी, कागवाड आणि अथणी तालुक्यातील जनता संपूर्णपणे महाराष्ट्राच्या बाजारपेठेवर अवलंबून आहे. बेळगावमध्ये बाजारासाठी यावयाचे असल्यास त्यांना जवळपास शंभर किलोमीटर प्रवास करून यावं लागतं. येथील जनतेला मिरज, सांगली, कोल्हापूर, इचलकरंजी सारख्या शहरांची गरज आहे. चिकोडी जिल्ह्यातील जनता अनेक दशकांपासून स्वतंत्र जिल्ह्याची मागणी करत आहे. बेळगाव जिल्ह्यातील १४ आमदार असूनही त्याचा कोणताही फायदा झाला नाही. आगामी विधानसभा अधिवेशनात स्वतंत्र चिकोडी, गोकाक जिल्ह्याच्या मागणीसंदर्भात आंदोलन करण्यात येणार आहे, अशी प्रतिक्रिया केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी दिली.

स्वतंत्र चिकोडी, गोकाक जिल्ह्याच्या मागणीवरून आंदोलन पेटण्याची चिन्हे दिसून येत असून गेल्या अनेक वर्षांपासून होत असलेली हि मागणी आगामी विधानसभा अधिवेशनात मांडण्यात येईल का? सरकार स्वतंत्र जिल्ह्यासंदभात कोणता निर्णय घेईल? आंदोलन कोणते वळण घेईल? हे पाहावे लागेल.

Tags: