खानापूर तालुक्यातील नंदगडच्या पश्चिमेला असणाऱ्या आनंदगडावर दरवर्षी श्री स्वयंभू दुर्गा देवीचा नवरात्रौत्सव भक्तिभावाने, जल्लोषात साजरा करण्यात येतो. उद्या ७ ऑक्टोबरपासून १५ ऑक्टोबरपर्यंत यंदाचा नवरात्रौत्सव गडावर साजरा करण्यात येणार आहे.

होय, मंदिरांप्रमाणेच गड-किल्ल्यांवरील दुर्गा मंदिरात नवरात्रौत्सव साजरा करण्याची आपली परंपरा आहे. त्यानुसार नंदगडजवळील आनंदगड या किल्ल्यावरील श्री स्वयंभू दुर्गा देवीचा नवरात्रौत्सव गुरुवारपासून साजरा करण्यात येणार आहे. उद्या सकाळी चौघडा वादनाने या उत्सवाचा प्रारंभ करण्यात येणार आहे. त्यानंतर ९ दिवस दररोज दुर्गादेवीची वेगवेगळ्या रूपात पूजा बांधण्यात येणार आहे. यावेळी सरकारच्या आदेशानुसार मास्क घालून, सामाजिक अंतर पाळून सर्व धार्मिक विधी, पूजा करण्यात येणार आहे. भक्तांनी याची नोंद घेऊन सहकार्य करावे असे आवाहन श्री स्वयंभू दुर्गा देवी नवरात्रौत्सव मंडळाचे अध्यक्ष खेमाजी पाटील यांनी कळविले आहे. 


Recent Comments