Khanapur

खानापूर तालुक्याच्या विकासासंदर्भात सोनाली सरनोबत यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

Share

खानापूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, यासाठी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना डॉ. सोनाली सरनोबत यांनी निवेदन सादर केले.

खानापूर तालुका हा मोठा आहे. या तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा. या तालुक्यात केवळ पाच प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यरत आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून मूलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. या सर्व आरोग्य केंद्रांमध्ये मूलभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, यासंदर्भात भाजप जिल्हा महिला घटकच्या उपाध्यक्षा डॉ. सोनाली सरनोबत यांनी निवेदन सादर केले. बंगळूरमध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन डॉ. सरनोबत यांनी निवेदन सादर केले. यावेळी पक्षाचे नेते उपस्थित होते.

Tags: