Dharwad

आरक्षण लढा : पंचमसालींचे हुबळीत प्रतिज्ञा पंचायत अभियान

Share

 पंचमसाली समुदायाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी सुरु असलेला लढा आणखी तीव्र करण्यासाठी हुबळीतील गोकुळ रोडवरील गोकुळ गार्डन येथे २५ सप्टेंबरला प्रतिज्ञा पंचायत अभियान राबवण्यात येणार आहे. स्वागत समितीचे अध्यक्ष निंगाप्पा करीकट्टी यांनी ही माहिती दिली.

व्हॉईस ओव्हर : हुबळी येथे बुधवारी पत्रकार परिषदेत बोलताना निंगाप्पा करीकट्टी यांनी सांगितले की, पंचमसाली समुदायाला २-ए आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी राज्यात आंदोलन सुरु आहे. येत्या १ ऑक्टोबरच्या आत मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आरक्षण मिळण्यासाठी आवश्यक पावले उचलली पाहिजेत. सरकारने आमच्या मागण्या प्राधान्य तत्वावर मान्य केल्या नाहीत तर पुढील काळात बेंगळुरातील फ्रीडम पार्कवर उग्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा त्यांनी दिला बाईट यावेळी धारवाड जिल्हा पंचमसाली समाजाचे युवा शाखाध्यक्ष विरेश उंडी, नागराज गौरी आदी उपस्थित होते.

 

Tags: