खडीवाहू ट्रकचा टायर फुटल्याने चालकाचे नियंत्रण सुटून दुभाजकाला धडकल्यानंतर ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याची दुर्घटना खानापूर तालुक्यातील गणेबैल गावाजवळ घडली.

होय, गुंजीकडे खडी घेऊन चाललेल्या केए २२-बी ८३३७ क्रमांकाच्या एका ट्रकचा टायर अचानक फुटल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे ट्रक दुभाजकाला धडकला. ही धडक एवढी जबरदस्त होती की, लगेचच मोठा आवाज होऊन ट्रकने पेट घेतला. रमेश तम्मूचे असे ट्रकचालकाचे नाव असून, तो खानापूर तालुक्यातील माडीगुंजी गावचा रहिवासी आहे. तर आगीच्या भक्ष्यस्थानी पडलेला ट्रक भाग्यनगर येथील उत्तमकुमार बापशेठ यांच्या मालकीचा असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविली.


Recent Comments