Hukkeri

दलित मुलीवर अत्याचाराच्या निषेधार्थ मोर्चा, निदर्शने 

Share

दलित मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करून आंबेडकर ध्वनी कर्नाटक दलित संघर्ष समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

मुडलगी तालुक्यातील राजापूर गावात एका दलित मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची निंद्य घटना घडली. त्याच्या निषेधार्थ कर्नाटक दलित संघर्ष समिती आंबेडकर ध्वनीचे जिल्हाध्यक्ष अजित हरिजन यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी गोकाक तालुक्यातील अंकलगी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून निदर्शने केली. यावेळी बोलताना अजित हरिजन म्हणाले, राजापूर गावात १६ वर्षांच्या अल्पवयीन दलित मुलीवर अन्य समाजातील ५ जणांनी सामूहिक बलात्कार केला आहे. याची वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या अत्याचाऱ्यांना कठोर शिक्षा करावी तसेच पीडित मुलीच्या कुटुंबाला सुरक्षा पुरवावी अशी मागणी निदर्शकांनी केली. या मागणीचे निवेदन अंकलगी पीएसआय यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले.

यावेळी दलित नेते येसा हरिजन, अडिवेप्पा कळसन्नवर, आकाश हरिजन, दीपक हरिजन, सिद्दप्पा सन्नक्की, लक्ष्मण पुजेरी आदी उपस्थित होते.

 

 

Tags: