बेळगावातील टिळक चौकात शनिवारी एका इन्व्हर्टरच्या दुकानात बॅटरीचा स्फोट झाला. त्यामुळे या परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
होय, शनिवारी बेळगावातील टिळक चौकातील अशोक बंगेरा यांच्या इन्व्हर्टरच्या दुकानात बॅटरीचा स्फोट झाला. दुपारी २ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. विकेंड कर्फ्यू असल्याने दुपारी २ च्या सुमारास बाजारपेठेत दुकाने बंद होत असतानाच हा स्फोट झाला. स्फोटानंतर दुकानात आग लागली. याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला. या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण पसरले. या संदर्भात ‘आपली मराठी’ला माहिती देताना दुकानमालक अशोक बंगेरा यांनी सांगितले की, पॉवर चार्ज होऊन लहान बॅटरीचा स्फोट झाला. यात कसलेही नुकसान झालेले नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. त्याबद्दल त्यांचे आभार मानले.
घटनेनंतर खडेबाजार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत खडेबाजार पोलीस ठाण्यात नोंदणी झाली आहे.
Recent Comments