Belagavi

बेळगाव मनपा निवडणुकीची रंगत वाढली : अंतिमतः ३८५ उमेदवार रिंगणात

Share

बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणूक रिंगणात अंतिमतः ३८५ उमेदवार राहिले आहेत. गुरुवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी १२७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

अखेरच्या दिवशी १२७ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. बेळगाव महानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येऊ लागली आहे तसतसा त्यात रंग भरू लागला आहे. राष्ट्रीय पक्ष प्रथमच पक्ष चिन्हासह ही निवडणूक लढवीत आहेत. भाजपने ५८पैकी ५५ प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. त्याच्या पाठोपाठ काँग्रेसने ४५ प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. स्थापनेपासून प्रथमच बेळगाव मनपा निवडणूक लढवीत असलेल्या आम आदमी पक्षाने २८ प्रभागांत उमेदवार उभे केले आहेत. तर जेडीएसने ११, एआयएमआयएमने ७, यूपीपीने व एसडीआयएफने प्रत्येकी १ उमेदवार उभा केला आहे. आजवरच्या इतिहासात बेळगाव मनपावर प्राबल्य मिळवून असलेल्या महाराष्ट्र एकीकरण समितीने २१ उमेदवार उभे केले आहेत. म. ए. समिती व शिवसेनेने काही उमेदवारांना पाठिंबा देऊन पुरस्कृत केले आहे. राष्ट्रीय पक्षांच्या थेट सहभागाने यावेळची बेळगाव पालिकेची निवडणूक चुरशीची ठरली आहे. नव्या प्रभाग पुनर्रचनेनंतर होत असलेल्या या निवडणुकीत उमेदवारांना त्यांचा वैयक्तिक प्रभाव, मतदारांशी असलेला संपर्कच विजयाला हातभार लावणार असा अंदाज आहे. एकंदर प्रभाग पुनर्र्चना, राष्ट्रीय पक्षांचा थेट सहभाग यामुळे निवडणुकीतील रंगत वाढली असली तरी अंतिमतः उमेदवारांचा विजय हा मतदारराजाच्याच हातात आहे हे निश्चित !

 

 

Tags: