दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी गुरुवारी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेऊन विविध विषयांवर चर्चा केली.
केंद्राकडून राज्याला मिळवायची जीएसटी भरपाईची देय रक्कम देण्यासह अन्य महत्वाच्या विषयांवर मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा केली. यावेळी जलसंसाधन मंत्री गोविंद कारजोळ, आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, खा. शिवकुमार उदासी आदी उपस्थित होते.


Recent Comments