Belagavi

वकिलांसाठीच्या डायनिंग हॉलचे उदघाटन:

Share

  बेळगावातील वकील संघटनेच्या जुन्या हॉलमध्ये वकिलांसाठीच्या डायनिंग हॉलचे गुरुवारी प्रधान जिल्हा सत्र न्या. सी. एम. जोशी यांच्याहस्ते उदघाटन करण्यात आले. वकिलांना व पक्षकारांना जेवणाची सोय व्हावी यासाठी बेळगाव वकील संघटनेच्या जुन्या सभागृहात नव्याने बांधण्यात आलेल्या डायनिंग हॉलचे गुरुवारी प्रधान जिल्हा व सत्र न्या. सी. एम जोशी यांनी उदघाटन केले.

त्यानंतर बोलताना न्या.सी. एम. जोशी म्हणाले, राज्यात बेंगळुरूनंतर बेळगाव हाच सर्वात मोठा जिल्हा आहे. संपूर्ण जिल्ह्यात ७८ कोर्ट आहेत. एकट्या बेळगाव शहरातच ३३ कोर्ट आहेत. त्यामुळे येथे रोज हजारो लोकांची ये-जा असते. वकील आणि या लोकांच्या सोयीसाठी नव्याने डायनिंग हॉल बांधण्यात आला आहे. वकील संघाचे हे कार्य स्तुत्य आहे. यामुळे वकिलांची कार्यक्षमताही वाढीस लागेल असे ते म्हणाले. त्यानंतर बोलताना ज्येष्ठ वकील बी. जे. गंगाई म्हणाले, वकील संघटनेचे माजी अध्यक्ष दिवंगत ऍड. ए. जी. मुळवाडमठ यांनी या डायनिंग हॉलचे स्वप्न पहिले होते. त्यांनी जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मंजूर करवून घेतला. त्याचेच फळ म्हणून हा डायनिंग हॉल साकारला आहे असे सांगितले.ज्येष्ठ वकील आर. सी. पाटील म्हणाले, वकील, पक्षकारांसाठी डायनिंग हॉल असावा अशी आमची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. ती पूर्ण झाली आहे. यामुळे दिवंगत ऍड. ए. जी. मुळवाडमठ यांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. यावेळी बेळगाव वकील संघटनेचे उपाध्यक्ष गजानन पाटील, पदाधिकारी शिवपुत्र फटकळ, आर. एस. कामत यांच्यासह वकील उपस्थित होते.

 

 

Tags: