Belagavi

आर. एल. लॉ कॉलेज २७ पासून राष्ट्रीय प्रारूप न्यायालय स्पर्धा

Share

बेळगावातील कर्नाट्क लॉ सोसायटीच्या राजा लखमगौडा लॉ कॉलेजतर्फे २७ ते २९ ऑगस्टपर्यंत अकरावी राष्ट्रीय प्रारूप न्यायालय स्पर्धा घेण्यात येणार आहे. कॉलेजच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष एस. व्ही. गणाचारी यांनी ही माहिती दिली.  

: बुधवारी बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना एस. व्ही. गणाचारी यांनी सांगितले की, अकराव्या एम. के. नंबियार स्मृती राष्ट्रीय प्रारूप न्यायालय स्पर्धेचे आर. एल लॉ कॉलेजमध्ये २७ ते २९ ऑगस्टपर्यंत ३ दिवस आयोजन केले आहे.  ही संपूर्ण स्पर्धा ऑनलाईन पद्धतीने होणार असून न्यायाधीशसुद्धा कॉलेजमधूनच निकाल देणार आहेत. गेल्यावर्षी १६ राज्यातून स्पर्धक आले होते. यावेळी कोरोनामुळे काही निर्बंध आले आहेत. रविवारी अंतिम सत्रातील स्पर्धा होणार आहे.

स्पर्धेच्या समारोप समारंभात अत्युत्तम विद्यापीठाचे डीन प्रा. संदीप देसाई प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. उदघाटन समारंभात कर्नाटक लॉ सोसायटीचे अध्यक्ष अनंत मंडगी, चेअरमन प्रदीप साहुकार व अन्य मान्यवर पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. ऍटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांचे वडील याच महाविद्यालयात शिकले होते. त्यामुळे त्यांनी ही स्पर्धा पुरस्कृत केली आहे असे एस. व्ही. गणाचारी यांनी सांगितले.  याप्रसंगी आर. एल. लॉ कॉलेजच्या प्रशासकीय मंडळाचे सदस्य उपस्थित होते.

 

 

Tags: