बेळगाव महानगरपालिकेच्या ३ सप्टेंबरला होत असलेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रिंगणात एकूण ५१९ उमेदवार उतरले आहेत.
बेळगाव महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा सोमवारी हा अंतिम दिवस होता. अखेरच्या दिवशीच अर्ज भरण्यासाठी मोठी गर्दी झाली. अखेरच्या दिवशी एकूण ४३४ उमेदवारांनी आपले अर्ज सादर केले. त्यामुळे एकूण ५८ प्रभागांसाठी शेवटच्या दिवसापर्यंत एकूण ५१९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. २६ ऑगस्ट हा उमेदवारी मागे घेण्याचा अखेरचा दिवस असून यादिवशी किती उमेदवार आपली उमेदवारी मागे घेतात यावर रिंगणात राहिलेल्या अंतिम उमेदवारांची निश्चित संख्या समजणार आहे.एकंदर भाजप-काँग्रेस या राष्ट्रीय पक्षांची मनपा निवडणुकीत थेट टक्कर होणार असल्याची चर्चा असली तरी महाराष्ट्र एकीकरण समिती-शिवसेना युतीसोबत या दोन्ही पक्षांना कडवी लढत द्यावी लागेल. त्याशिवाय आम आदमी पार्टी, जेडीएस आणि अपक्ष किती मते घेतात यावरही राष्ट्रीय पक्षांचे भवितव्य अवलंबून आहे.
Recent Comments