Belagavi

बेळगाव जीटीटीसीमध्ये नव्या डिप्लोमा कोर्सचा प्रारंभ

Share

सरकारी साधन आणि प्रशिक्षणच्या बेळगाव येथील उपकेंद्रात दोन नव्या डिप्लोमा अभ्यासक्रमाला सुरुवात करण्यात आली असून २०२१- २२ या शैक्षणिक वर्गासाठी प्रवेश देण्यात येत आहेत. यासंदर्भात या केंद्राचे प्राचार्य जी. व्ही. मोगेरी यांनी माहिती दिली आहे.

सोमवारी बेळगाव वार्ता भवन येथे सोमवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत बोलतांना त्यांनी हि माहिती दिली असून प्राचार्य जी. व्ही. मोगरी यांनी या कोर्ससाठी प्रवेशप्रक्रिया सुरु झाली असल्याचे सांगितले. ते पुढे म्हणाले कि, सरकारी साधने आणि प्रशिक्षण केंद्राच्या बेळगाव येथील उपकेंद्रात ‘डिप्लोमा इन टूल अँड डाय मेकिंग’ आणि ‘डिप्लोमा इन प्रिसिजन मॅन्युफॅक्चरिंग’ अशा दोन डिप्लोमा अभ्यासक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरु झाली असून ३१ ऑगष्ट पर्यंत विद्यार्थ्यांना समुपदेशन करण्यात येईल.

हा अभ्यासक्रम चार वर्षांचा असून ३ वर्षे महाविद्यालयातच प्रशिक्षण देण्यात येणार असून १ वर्ष विविध उद्योगांचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येणार आहे. येथे प्रशिक्षण घेतलेले विद्यार्थी देशाच्या कानाकोपऱ्यात कार्यरत असून परदेशातदेखील अनेक विद्यार्थी कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक विद्यार्थ्यांनी बेंगळूर, पुणे शिवाय बेळगावमध्ये स्वतःचा उद्योग सुरु केला आहे. स्वतःचा उद्योग सुरु करून अनेकांना रोजगार देण्याचे कार्य या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी केले आहे. आमच्या येथे प्रशिक्षण घेतलेल्या १०० पैकी १०० विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असून प्रत्येक वर्षी कॅम्पस सिलेक्शनच्या माध्यमातून १५ ते २० कंपन्या देखील येतात. या अभ्यासक्रमाचा विद्यार्थ्यांनी योग्य सदुपयोग करून घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.या पत्रकार परिषदेला रमाकांतमठ, अरविंद कडेद यांच्यासह इतर उपस्थित होते.

Tags: