Belagavi

बेळगावात विविध केंद्रांवर टीईटी पात्रता परीक्षा

Share

बेळगावातील विविध केंद्रांवर रविवारी विविध परीक्षा केंद्रांवर शिक्षक भरतीसाठीची टीईटी पात्रता परीक्षा घेण्यात आली. परीक्षा सुरळीत पार पडली.

सरकारी माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून रुजू होऊ इच्छिणाऱ्या बीएड पदवीधारक उमेदवारांना नियुक्तीपूर्वी टीचर्स एलिजिबिलिटी टेस्ट ही शिक्षक पात्रता परीक्षा द्यावी लागते. भविष्यातले चांगले, गुणवान शिक्षक निवडण्यासाठीची ही टीईटी परीक्षा रविवारी बेळगावातील विविध केंद्रांवर घेण्यात आली. बेळगावातील सरदार्स हायस्कुल, मराठा मंडळ हायस्कुल, जी. ए. हायस्कुल आदी हायस्कुल केंद्रांवर ही परीक्षा पार पडली. सकाळी १० ते दु. १२.३० या वेळेत पहिला व दुपारी २.३० ते सायंकाळी ५ या वेळेत दुसरा अशा २ सत्रांत ही परीक्षा घेण्यात आली. या संदर्भात एका परीक्षार्थ्याने ‘आपली मराठी’ला सांगितले की, २ सत्रांत टीईटी परीक्षा घेण्यात आली. कसून अभ्यास केला आहे. त्यामुळे यशस्वी होऊन शिक्षक बनेन अशी आशा आहे.

मास्क, सॅनिटायझरचा वापर, सामाजिक अंतराचे पालन अशा कोविड मार्गसूचीचे काटेकोर पालन करून हि परीक्षा घेण्यात आली. तत्पूर्वी परीक्षा केंद्रांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले होते. एकंदर, विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करू शकणाऱ्या प्रतिभावान शिक्षकांची निवड करण्यासाठी बेळगावात आज टीईटी परीक्षा घेण्यात आली. आता त्यात किती उमेदवार उत्तीर्ण होऊन शिक्षकीपेशा स्वीकारतात हे पहावे लागेल.

 

 

 

 

Tags: