कोरोना संकटाच्या काळातच गगनाला भिडणारी दरवाढ, दुप्पट करवसुली यामुळे जनसामान्यांचे जीवन असह्य झाले आहे. ते सुसह्य होण्यासाठी उपाय योजण्याची मागणी स्वराज निर्माण आंदोलनाच्या वतीने राष्ट्र्पतींना करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना दिले.
कोरोना संकटात जनसामान्यांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. लोकांचे रोजगार गेले, पण इंधन दरवाढ, दुप्पट करवसुली अशी संकटे उभी ठाकली आहेत. १५ लिटर खाध्यतेल विकत घेण्यासाठी शेतकऱ्याला १ टन ऊस विकावा लागतोय, ४ लिटर दूध विकल्यावर १ लिटर पेट्रोल घेता येते. व्यापारीही संकट आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य अंधारात आहे. वैध्यकीय क्षेत्रात औषधांचा तुटवडा जाणवतोय. बेरोजगारी वाढली आहे अशा अनेक समस्या आवासून उभ्या ठाकल्या आहेत. केवळ कोरोना लसीकरण सोडले तर दुसरे कुठलेही काम होत नाहीय. या स्थितीत सरकारने लोकांचे जीव वाचवले पाहिजेत अशी मागणी स्वराज निर्माण आंदोलनाच्या वतीने राष्ट्र्पतींकडे करण्यात आली आहे.
यावेळी बोलताना संघटनेचे सचिव संजय बी. गोटाडकी म्हणाले, कोरोना संकटात केवळ गरिबांचेच नव्हे तर मध्यमवर्गीयांचे जगणेही कठीण झाले आहे. जगण्यासाठी लागणार कोणताही खर्च थांबवणे अशक्य आहे. इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंचे दर रोज वाढत आहेत. महागाई वाढत असताना बँका मात्र या ना त्या नावाने दुप्पट शुल्क वसुली करत आहेत. अशा प्रकारची अराजकता, अव्यवस्था, पैसे उकळण्याचा धंदा याआधी कधीच झाला नव्हता. लोकांवरचे हे संकट दूर करण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी स्वराज निर्माण आंदोलनाचे अध्यक्ष राजन हुलबत्ते, प्रशांत कुलकर्णी, दस्तगीर आगा, किशोर जैन, हेमंत लिगाडे, मोहन परमार आदी उपस्थित होते.
Recent Comments