बेळगावच्या रेसकोर्स गोल्फ मैदानात मॉर्निंग वॉकर्सना दिसलेला बिबट्या नसून जंगली मांजर असल्याची माहिती वनविभागाने दिली आहे .
बेळगाव शहरात , गोल्फ मैदानावर बिबट्या दिसल्याचा खबरीने ,शहरात भीतीचे वातावरण पसरले होते . मॉर्निंग वॉकर्सनी दिलेल्या माहितीनुसार वनविभागाने बिबट्याची शोधमोहीम सुरु केली होती .
आणि सीसीसीटीव्ही देखील लावण्यात आले होते . बिबट्याला पकडण्यासाठी दोन पिंजरेही लावण्यात आले होते . मात्र सीसीटीव्हीच्या फुटेजनुसार , गोल्फ मैदानावर आढळलेला बिबट्या नसून मोठे जंगली मांजर असल्याचे स्पष्ट झाले आहे .
डीसीएफ हर्ष बानू , एसीएफ एमबी कुसनाळ आणि आरएफओ शिवानंद मगदुम , काकति आरएफओ नागराज भीमगोळ यांच्या नेतृत्वाखालील शोधमोहिमेत ही माहिती मिळाली आहे .
पण विभागाकडून , बेळगावकराना सूचित करण्यात आले आहे कि , कोणीही रेसकोर्सच्या गोल्फ मैदानावर फिरण्यासाठी जाऊ नये .
Recent Comments