Belagavi

उषाताई  पोतदार फाऊंडेशनचे सत्कार्य : अंध दीपा आणि रवी यांची सप्तपदी

Share

सामाजिक कार्याद्वारे परिचित बेळगावच्या उषाताई  पोतदार फाऊंडेशनने आज आणखी एका  अंध जोडप्याचा  विवाह करुन देऊन सत्कार्य  केले आहे.  बेंगलोरच्या  रविचा विवाह , बेळगावच्या  दीपा  यांच्या  विवाहाला   उषाताई  फाऊंडेशनच्या प्रमुखांनी  हजेरी लावली होती . या  फाउंडेशकडून हा विवाह मिळून आतापर्यंत २५ विवाह लावून देण्यात आले आहेत .

बेळगाव येथील हनुमान नगरातील ,  भक्तीवास  सांस्कृतिक भवनामध्ये ,  आज या अंध जोडप्याच्या विवाहाचा मंगल सोहळा पार पडला .   बेळगावच्या  उषा पोतदार फाऊंडेशनकडून  सामाजिक कार्यासाठी प्रख्यात आहे .  त्यांनी याआधी  अशी २४  लागणे लावून दिली आहेत .  आज एका नवीन अंध जोडप्याचा विवाह करुन देऊन , २५ वा विवाह कार्यक्रम पूर्ण केला आहे .  समर्थनम दिव्यांग  संस्थेच्या दीपा आणि बेंगळुरूच्या रवी   त्यांचा विवाह आज पार पडला .     बेळगावची पदवीधर असलेली दीपा तसेच बेंगळूरमधील  पदवीधर असलेल्या रवी यांच्या जीवनात यामुळे आशेचा दीप प्रज्वलित झाला असून ते दोघे आता एकमेकांचे जीवनसाथी बनले आहेत . बेळगावच्या उषाताई  पोतदार फाऊंडेशन, स्फूर्ती असोसिएशन आणि समर्थनम  अंध संस्थेच्या  सहकार्याने हा विवाहसोहळा पार पडला .

यावेळी बोलताना , उषाताई पोतदार फाऊंडेशनचे प्रमुख अनिल  पोतदार म्हणाले कि , “गेली कित्येक वर्षे आपण स्फूर्ती  असोसिएशनच्या सहकार्याने  अंध जोडप्याचे लग्न लावून देत आहोत .   आम्ही क्रिकेटसह अनेक उपक्रम राबवले आहेत.  यावेळी आम्ही पोतदार फाऊंडेशन तर्फे हे २५ वे लग्न लावून दिले आहे . आंधळे लग्न करू नये का? . त्यांनी स्वावलंबी जीवन जगावे या  उद्देशाने बरेच कार्यक्रम  घेत आहोत . ही समाजसेवा आनंददायक आहे.  आम्ही दरवर्षी  विवाह लावून देत होतो .   यावर्षी कोविडच्या पार्श्वभूमीवर आम्ही , कोविड नियमांचे पालन करुन ,  हा विवाह केला .  सर्व काही विधिवत पार पडले .

स्फूर्ती  असोसिएशनकडून हा २५ वा विवाह सोहळा पार पडला आहे.  तसे पाहिल्यास हे रौप्यमहोत्सवी लग्न आहे .  कोविडच्या पार्श्वभूमीवर  सध्या , संक्षिप्त पद्धतीने विवाह   करण्यात आला .   या लग्नामुळे  आता बेळगाव आणि बेंगळुरमधे सोयरीक जुळली आहे .   हे दोघेही  अंध,   पदवीधर आहेत.  समर्थनमने   अंधांच्या जीवनात प्रकाश आणण्याचे कार्य केले आहे.  आमच्या तीन संघटनांनी मिळून , अनिल पोतदार  यांच्या सहकार्याने अंधांसाठी विशेष कार्य केले आहे.

नवरदेव रवी याने सांगितले कि  , मी एक पदवीधर आहे . बंगळूरमध्ये राहतो . बेळगावच्या दीपा   हिच्याशी आज लग्न झाले आहे ,मी खुश आहे . अरुणकुमार यांची पत्नी शैलजाक्का यांच्यामार्फत दीपाशी परिचय झाला . आम्ही एकमेकांशी चर्चा केली .  आणि लग्न करण्याचा निर्णय घेतला . सर्वांच्या सहकार्याने आमच्या जीवनात हा सुखाचा क्षण आला आहे .

नववधू दीपा हिने सांगितले कि,मी पदवीधर आहे.   माझ्या  नातेवाइक शैलजा अक्का यांच्यामुळेच हे लग्न जमले . त्या मला विचाराच्या कि लग्न कधी करणार ,  मी त्यांना  वर शोधण्यास सांगितले.  त्याने खरोखर वर शोधला आहे.  या सर्वांच्या संमतीने माझे लग्न होत आहे.  मी एक नवीन आयुष्य, आमचा स्वावलंबन आणि स्वाभिमानाची आमची इच्छा पाहत आहे.

 

 

समर्थनम अंध संस्था ,  उषाताई  पोतदार फाउंडेशन, स्फूर्ती संघटनेचे पदाधिकारी ,  पोतदार कुटुंबीय आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

 

Tags: