कर्नाटक राज्योत्सवाच्या निमित्ताने राष्ट्रीय समाज कल्याण सेवा संस्था, बेळगाव यांच्यावतीने राज्यस्तरीय पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

रविवारी कुमार गंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या या कार्यक्रमात चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांच्या उपस्थितीत विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. श्री गुरूशांतेश्वर संस्थान हिरेमठ, हुक्केरीचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांचे दिव्य सान्निध्य कार्यक्रमाला लाभले. चिक्कोडीच्या लोकसभा खासदार प्रियांका जारकिहोळी यांच्या हस्ते उद्घाटन पार पडल्यानंतर युवा काँग्रेसचे राज्य सरचिटणीस राहुल जारकिहोळी ,चिक्कोडीच्या शाळा शिक्षण विभागाचे उपसंचालक अजित मन्निकेरी , कर्नाटक साहित्य अकादमीच्या सदस्या डॉ. मैत्रेयीणी गदिगप्पगौडर आदींसह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.


चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामी यांनी शेतकऱ्यांनी केवळ आंदोलनांवर अवलंबून न राहता जागरूक आणि संघटित व्हावे, तसेच प्रत्येक अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय तरतूद केली आहे, असा प्रश्न सरकारला विचारण्याची ताकद निर्माण करावी, असे आवाहन केले. शेतकऱ्यांशिवाय समाजाचे अस्तित्व शक्य नसल्याचे सांगत त्यांनी कन्नड शाळा बंद पडू नयेत यासाठी पालकांनी मुलांना कन्नड शाळांमध्ये पाठवावे, शिक्षकांच्या सुविधांमधील कमतरता दूर करावी आणि शिक्षणासोबत मुलांमध्ये संस्कार रुजवावेत, असे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समाज कल्याण सेवा संस्थेचे राज्य मानद अध्यक्ष अर्जुन त. नायकवाडी, कन्नड व संस्कृत विभागाच्या सहाय्यक संचालिका विद्यावती भजंत्री, पत्रकार जवारिकाका, कर्नाटक राज्य चित्रकला शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस डॉ. अप्पासाहेब ल. गाणगेरी, साहित्यिक व सामाजिक विचारवंत डॉ. वेंकटेश आर. चौथाई, पत्रकार सदानंद बामणे, ज्योतिषशास्त्रज्ञ व पारंपरिक वैद्य के. आर. मंजुनाथ आराध्य आणि चिक्कोडी डायटचे व्याख्याते के. टी. कांबळे उपस्थित होते.

यावेळी विविध क्षेत्रांत कार्य करणाऱ्या मान्यवरांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आले. संस्थेचे राज्याध्यक्ष व पत्रकार लक्ष्मण सी. मेच्छन्नवर, राज्य उपाध्यक्ष वासुदेव आर. रारोड, शिक्षक मुथप्प बी. हुक्केरी, गायिका मंजुळा सु. मास्तमरडी यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी आणि निमंत्रित उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वेंकटेश आर. चौथाई यांनी केले.


Recent Comments